भुसावळ उपनगराध्यक्षपदाची सोनी बारसे यांना मिळणार संधी?


उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे यांचा कार्यकाळ संपला

भुसावळ : पालिकेचे उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे यांचा दोन महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आता उपनगराध्यक्षपदाची संधी कुणाला मिळणार? याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या पदासाठी नगरसेविका सोनी संतोष बारसे यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असलेतरी पक्ष श्रेष्ठी याबाबत नेमका काय निर्णय घेतात? यानंतर पदाधिकारी निश्‍चित होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

उपनगराध्यक्ष पदासाठी अनेक इच्छूक
सत्ताधारी गटाच्या नियोजनानुसार अखेरच्या वर्षात पहिल्या दोन महिन्यांसाठी ज्येष्ठ नगरसेवक रमेश निगराणी यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाली व त्यानंतर प्रमोद नेमाडे यांच्याकडे जबाबदारी आली. त्यांचाही कार्यकाळ 27 जून रोजी संपला असून त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढील टप्प्यात कुणाला उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळणार? या विषयी चर्चा सुरू झाल्या आहेत. माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे तसेच गटनेता ज्याचे नाव निश्‍चित करतील त्यांनाच या पदावर संधी मिळणार आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छूक असलेतरी प्रत्यक्षात कुणाला संधी मिळणार? हे लवकरच कळणार आहे. सोनी संतोष बारसे, राजेंद्र नाटकर यांची नावे चर्चेत असल्याने सुरूवातीला कुणाला संधी मिळते? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !