मुक्ताईनगरात इंधन दरवाढीविरोधात सिलिंडरची अंत्ययात्रा
राष्ट्रवादी पदाधिकार्यांनी केले मुंडण : केंद्र सरकारविरोधात पदाधिकार्यांची जोरदार घोषणाबाजी
मुक्ताईनगर : गेल्या काही दिवसात पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खाद्य तेलासह जीवनाश्यक वस्तूंच्या दरात मोठी दरवाढ झाली असून या दरवाढी विरोधात मुक्ताईनगरात सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सिलिंडरची प्रेतयात्रा काढत व मुंडण करीत अनोखे आंदोलन केले. प्रतीकात्मक स्वरूपातील वाहन आणि सिलेंडरला मृतदेह मानून सर्व विधीवत संस्कार करीत केंद्र सरकाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्रभैय्या पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली अंत्ययात्रा काढण्यात आली.
तहसील कार्यालयावर निघाली अंत्ययात्रा
यावेळी गॅस दरवाढी बद्दल केंद्र सरकारच्या जाहीर निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. प्रवर्तन चौक ते तहसील ऑफिस असा मोर्चा काढून तहसीलदार श्वेता संचेती यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार अरुण पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, गोटू सेठ महाजन, सावदा माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, ज्येष्ठ नेते रमेश नागराज पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, युवक कार्याध्यक्ष दीपक पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवनराजे पाटील, सोशल मीडिया अध्यक्ष शिवराज पाटील, पंचायत समिती सभापती सुवर्णा साळुंखे, उपसभापती सुनीता चौधरी, माजी सभापती दशरथ कांडेलकर, विलास धायडे, राजु माळी, भागवत पाटील, वसंत पाटील, किशोर चौधरी, माफदा तालुका अध्यक्ष रामभाऊ पाटील, सरचिटणीस रवींद्र दांडगे, कल्याण पाटील, सोपान दुट्टे, साहेबराव पाटील, युवक विधानसभा क्षेत्रप्रमुख गजानन पाटील, युवक तालुकाध्यक्ष शाहिद खान, महिला आघाडी तालुकाध्यक्ष लता सावकारे सुनील कोंडे, विशाल महाराज खोले, रावेर बाजार समिती संचालक पंकज येवले, सय्यद असगर, सुधाकर जावळे, दीपक मराठे, लिलाधार पाटील, यांची मोर्चात प्रमुख उपस्थिती होती.




दरवाढ रद्द न केल्यास रस्त्यावर उतरणार
येत्या काही दिवसात हि दरवाढ रद्द न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रस्त्यावर उतरून मोठया प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशारा अॅड.रोहिणी खडसे यांनी दिला. जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या साहेब पाटील म्हणाले की, मोदी सरकारने केलेल्या दरवाढी मुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले असून केंद्र सरकार दररोज भाववाढ करण्यात मश्गुल आहे. आम्ही या भाववाढीचा निषेध करतो येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या भावाढी विरोधात मोठया प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल.

