इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी वंदिता पारे तर सचिवपदी अलका भटकर


भुसावळ : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळची 2021-22 या वर्षांची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. क्लबच्या अध्यक्षपदी वंदिता पारे तर सेक्रेटरीपदी अलका भटकर यांची निवड करण्यात आली. व्हा.प्रेसिडेंट रुचिका शर्मा, इमिडिएट पास्ट प्रेसिडेंट शीतल भराडे, ट्रेझरर प्राची राणे, आयएसओ नूतन फालक, सी.सी.सुनंदा भारुळे, सदस्य- कमल सचदेव, रजनी सावकारे, मनीषा तायडे, पार्वती चांदवानी, जयश्री देवे, वृषाली पाटील याचा समावेश आहे. येणार्‍या वर्षभरात प्रथम गुलाबी शिरोज व मजबूत महिला मजबूत जग थीमच्या अंर्तगत महिलांचे सशक्तीकरण तसेच पर्यावरणा वरील प्रकल्पांचे नियोजन आणि आयोजन केले जाणार आहे. यासाठी रश्मी शर्मा व रत्नकांता अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !