कुटुंब बाहेर जाताच चोरट्यांनी साधली संधी : एक लाख 70 हजारांचा ऐवज लंपास


चाळीसगाव : कुटुंब कामानिमित्त बाहेर जाताच लक्ष ठेवून असलेल्या चोरट्यांनी संधी साधली. चाळीसगावच्या उत्कर्ष हाउसिंग सोसायटीत शिक्षक दिलीप पाटील व त्यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. सोमवारी कुटुंबातील सदस्य दुपारी बाहेर गेल्यानंतर घराला कुलूप असल्याची चोरट्यांनी संधी साधली. बेडरूममधील लाकडी कपाटातील 90 हजार रुपये किंमतीचे 45 ग्रॅम वजनाची मंगलपोत, 40 हजार रुपये किंमतीचे 20 ग्रॅमचे मिनी गंठन, 20 हजार रुपये किंमतीचा 10 ग्रॅम सोन्याचा तुकडा, 10 हजार रुपय किंमतीचे 5 ग्रॅमचे कानातील कर्णफुले जोड व 10 हजार रुपय रोख मिळून एक लाख 70 हजारांचा ऐवज लांबवण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !