भुसावळातील सर्वच आरोग्य केंद्रात 18 वर्षावरील नागरीकांचे व्हावे लसीकरण
भारतीय जनता पार्टीतर्फे पालिका मुख्याधिकार्यांना निवेदन
भुसावळ : शहरात 18 वर्षांवरील वयोगटातील नागरीकांची लसीकरण मोहिम द.शि.विद्यालय येथे राबविण्यात येत आहे परंतु येथे प्रचंड संख्येने गर्दी होत असल्याने कोरोनाचा फैलाव होण्याची भीती आहे. या वयोगटातील नागरीकांचे लसीकरण शहरातील विविध आरोग्य केंद्रात करावे, अशी मागणी मंगळवारी भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरातर्फे भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना निवेदन देऊन करण्यात आली.
नागरीकांना दुहेरी त्रास
नागरीकांना विविध आरोग्य केंद्रावर जाऊन टोकन घेऊन लसीकरणासाठी पुन्हा द.शि. विद्यालयात यावे लागत आहे त्यामुळे नागरीकांना दुहेरी त्रास होत आहे तसेच लसीकरणासाठी 18 वर्ष वयोगटातील तरुणी-महिला मोठ्या संख्येने येत असल्याने रोडरोमिओंचाही वावर वाढत आहे. भारतीय जनता पार्टी तर्फे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना ही परीस्थिती लक्षात आणून देण्यात आली. नगरपालिकेतर्फे लवकरच योग्य व सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्याधिकारी म्हणाले.



यांची निवेदन देताना उपस्थिती
निवेदन देतांना भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, जिल्हा चिटणीस शैलेजा पाटील, शहर सरचिटणीस संदीप सुरवाडे, अमोल महाजन, ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र नाटकर, राजेंद्र आवटे, प्रा.दिनेश राठी, गिरीश महाजन, शिशिर जावळे, खुशाल जोशी, बिसन गोहर, जयंतीलाल सुराणा, चंद्रशेखर इंगळे, सुरेश कुटे, संजय बोचरे, मुकंदा निमसे, पवन बुंदेले, प्रशांत निकम, मनोज पिंपळे, प्रवीण इखणकर, चेतन सावकारे, पंकज जैन, चेतन बोरोले, युवा मोर्चा अध्यक्ष अनिरुद्ध कुळकर्णी, नंदकिशोर बडगुजर, गोपीसिंग राजपूत, राहुल मेहरानी, लखन रणधीर, नागेश खरारे, प्रशांत भट, प्रणव डोलारे, लोकेश जोशी, अक्षय जाधव , मयुर सावकारे यांची उपस्थिती होती.

