भुसावळातील 28 कंत्राटी कर्मचार्‍यांची सेवा खंडित


भुसावळ : शहरातील 28 कंत्राटी आरोग्य कर्मचार्‍यांची सेवा 2 जुलैपासून खंडीत करण्यात आल्याने कंत्राटी कर्मचार्‍यांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत आरेाग्य विभागाने कंत्राटी आरोग्य कर्मचार्‍यांची भरती केली होती. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोविड सेंटर, ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर येथे हे कंत्राटी कर्मचारी कार्यरत होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतरही कर्मचार्‍यांना कमी करण्यात आले मात्र दुसर्‍या लाटेत पुन्हा या कर्मचार्‍यांना कामावर घेण्यात आले तर आता ही लाटही ओसरताच पुन्हा काम थांबवण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. भुसावळातील तीन वैद्यकीय अधिकारी, एक स्टॉफ नर्स, 12 एएनएम, एक एलटी, एक क्ष किरण तपासणीस, दोन स्टोअर ऑफीसर, दोन डीईओ, एक ईसीजी टेक्नीशियन, चार वॉर्ड बॉय यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या आदेशानुसार 2 जूलै पासून कार्यमुक्त करण्यात आले असून याबाबतचे आदेश वैद्यकीय अधीक्षक डॉ. मयुर चौधरी यांनी काढले आहेत. दरम्यान, या कर्मचार्‍यांना शासकिय सेवेत समाविष्ट न केल्यास आघाडी सरकार विरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा भाजप वैद्याकीय आघाडीचे सहसंयोजक डॉ.नि.तु.पाटील यांनी दिला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !