भुसावळात 35 वर्षांपूर्वी अभिनेता दिलीप कुमारांनी दिली होती भेट


भुसावळ : सिने सृष्टीतील दिग्गज अभिनेता दिलीप कुमार (98) यांचे बुधवारी सकाळी 7.30 वाजता मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात निधन झाल्याने त्यांच्या चाहत्यावर्गात मोठी शोककळा पसरली. सुमारे 35 वर्षांपूर्वी दिलीप कुमार हे भुसावळात आल्यानंतर त्यांच्याहस्ते स्व.भिकमचंदजी जैन उर्दू हायस्कूलचे उद्घाटन करण्यात आले व आपण त्यांचे स्वागत केले होते, अशी आठवण सामाजिक कार्यकर्ते जे.बी.कोटेचा यांनी सांगितली. या कार्यक्रमास माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी आमदार स्व.देविदास भोळे, माजी आमदार डी.के.चौधरी आदींची उपस्थिती होती, असेही कोटेचा म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !