माजी केंद्रीय मंत्र्यांच्या पत्नीची हत्या
मुंबई : दिवंगत माजी केंद्रीय मंत्री पी.रंगराजन कुमारमंगलम यांच्या पत्नी किट्टी कुमारमंगलम यांची मंगळवारी रात्री वसंत विहारमधील त्यांच्या घरी हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली. दुसर्या मजल्यावर किट्टी कुमारमंगलम यांचे वास्तव्य होते मात्र मंगळवारी रात्री धोबी आला, त्याने दरवाजा उघडला आणि तिला पकडून ओढत शेजारच्या खोलीत घेऊन गेला आणि बांधले तेव्हा दोन तरुण घरात घुसले आणि उशीने किट्टी यांचे तोंड दाबले आणि त्यांची हत्या केली. आरोपी धोबी राजू (24) यास अटक करण्यात आली. अन्य दोन आरोपींचीदेखील ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.




