भुसावळातील शिवाजी नगरात लो व्होल्टेजमुळे नागरीक त्रस्त


भुसावळ : शहरातील प्रभाग बारामधील शिवाजी नगर भागात खंडित वीजपुरवठ्याची समस्या सोडवावी तसेच सुरळीत दाबाने वीजपुरवठा करावा, अशी मागणी नागरीकांनी अतिरीक्त कार्यकारी अभियंता राहुल पावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या परीसरातील ग्राहकांनी दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, ग्राहक नियमितपणे वीज बिल भरतात मात्र दररोज खंडित वीजपुरवठा होत असल्याने नागरीकांना मोठा मनस्ताप सोसावा लागतो. त्यातच वीज आल्यानंतर पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नसल्याने ग्राहकांना अधिकच त्रास सोसावा लागतो. रात्री खंडित विजेमुळे चोर्‍या-घरफोड्या होण्याची भीती वाढली आहे. रात्री-बेरात्री केव्हाही वीजपुरवठा येत असल्याने महागडी उपकरणे नादुरुस्त होण्याची भीती आहे.

तांत्रिक बिघाड दूर करावा
याबाबत प्रत्यक्षात तपासणी करून काही तांत्रिक बिघाड असेल, तो दुरुस्त करावा व वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी बारामधील नागरीकांनी केली आहे. समस्या सुटणार नाही तोपर्यंत दरमहा लाईटबिल भरणार, असा इशारा या प्रभागातील गौरव राजेंद्र वाघ, हर्षल कापडे, रेहान अली, समीर महोमद, रफिक शेख, चेतन मेहते, आकाश अग्रवाल, प्रवीण भोसले, आशिष जाधव, विशाल अग्रवाल, महोमद जुबेर, नदीम शेख, अशोक पवार, थितू मेहरा, नेहाल यादव, तुषार पवार, अभिषेक देवपूजे, नितीन वाघ, आकाश निकम यांनी वीज कंपनीला दिला आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !