राष्ट्रीय दलित पँथरचा वर्धापनदिन उत्साहात
जळगाव : राष्ट्रीय दलित पँथरचा वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. जळगाव शहरातील मिराई लॉनवर झालेल्या कार्यक्रमात गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात आले. याप्रसंगी जळगाव जिल्हाध्यक्ष सुदामभाई सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष राजू तायडे, प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष वैशाली हेरोडे, महानगराध्यक्ष संजय निकम, आरपीआयचे महानगराध्यक्ष मिलिंद सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष मोहन अढंगे, दादाराव हेरोळे, तालुकाध्यक्ष श्रावण सोनवणे, विलास बोरीकर, तालुकाध्यक्ष सुनील रायमोळे, महिला जिल्हा सरचिटणीस संगीता दैया, महिला सदस्य प्रतिभा सोनवणे, महिला सदस्य संगीता मोरे, बन्सीलाल राजपूत, भगवान पाटील, अनिल अढंगे, मिलिंद भालेराव अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.




