ऑर्डनन्स फॅक्टरी निगमीकरणाचा वरणगाव फॅक्टरीत निषेध


वरणगाव : वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीतील आईज गेटसमोर बीएमएस युनियन, इंटक युनियन व कामगार युनियनतर्फे निगमीकरण धोरणाविरोधात काळया फिती लावून आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने देशभरातील 41 ऑर्डनन्स फॅक्टरींच्या निगमीकरण करण्याचा अन्यायकारक निर्णय घेतले असून ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड अंतर्गत काम करणार्‍या 70 कर्मचार्‍यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाचे सात भागांमध्ये विभाजन करण्यात आले आहे.

निगमीकरण निर्णयाचा निषेध
या आधी 12 ऑक्टोबर 2020 पासून बेमुदत संप सुरू करण्याची नोटीस युनियनतर्फे देण्यात आली होती परंतु चीफ लेबर कमिशनर यांनी सरकार आणी फेडरेशन यांच्यातील औद्योगिक विवादामध्ये मध्यस्थता करून कन्सीलिएशन सुरू केले होते त्यामुळे औद्योगिक अधिनियम सेक्शन 33 अंतर्गत कर्मचारी पक्षाला संप स्थगीत करावा लागला होता. सरकारवर सुध्दा जैसे थे स्थितीमध्ये असणे बंधनकारक होते परंतु सरकार ऑर्डनन्स फॅक्टरीजचे निगमीकरण करण्याच्या दिशेने पुढे जात राहिले व सरकारच्या दबावात 15 जुन रोजी कन्सिलिएशन बैठकीत मान्यताप्राप्त महासंघांच्या प्रतिनिधींच्या अनुपस्थितीमध्ये चीफ लेबर कमिश्‍नर यांनी कन्सिलिएशन प्रोसेस विफल झाल्याबद्दल रीपोर्ट सरकारला सादर केला आणि लगेच दुसर्‍या दिवशी16 जुन रोजी कॅबिनेटच्या बैठकीत ऑर्डनन्स फॅक्टरीज चे निगमीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.




काळा कायदा लागू करून हक्क हिरावला
कन्सिलिएशन विफल झाल्यामुळे पुन्हा भारतीय प्रती रक्षा मजदूर संघ, ऑल इंडिया डीफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन व इंडियन नॅशनल डीफेन्स वर्कर्स फैडरेशनतर्फे 26 जुलैपासुू बेमुदत संप पुकारण्यात आला होता. निगमीकरणाच्या विरोधात युनियन्सने संप करू नये म्हणून इसेंशियल डीफेन्स सर्विसेस ऑर्डीनन्स 2021 हा अध्यादेश व काळा कायदा लागु करुन कर्मचार्‍यांना त्यांच्या न्याय मागण्यांसाठी संप करण्याचा हक्क हिसकावला असून सर्व ऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचार्‍यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या काळ्या कायद्याविरोधात आईज गेटसमोर काळ्या फीती घालुन घोषणाबाजी करण्यात आली.

यांचा आंदोलनात सहभाग
याप्रसंगी योगेश सूर्यवंशी, एस.आर.पाटील, महेश पाटील, सचिन चौधरी, रवी देशमुख, विशाल भालशंकर, विजय जगताप, बी.बी.सपकाळे, रवी पाटील, संतोष बार्‍हे, दीपक पाटील, मनीष महाले, सुहास विभांडीक, पवन निंबाळकर, योगेश ठाकरे, गणेश भंगाळे, योगेश बोरोले, सुरेश बत्तीसे, महेश वायकोळे, कमलेश सिंग, सुधीर गुरचळ, पंकज भंगाळे, सदानंद उन्हाळे, वाल्मीक खोडकर, प्रशांत ठाकूर, हर्षल सुतार, निलेश घुले, महेश देशमुख, जयश्री झोपे, गौतम सुरवाडे आणी बी.एम.एस. युनियन, इंटक युनियन, व कामगार युनियनचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व कार्यकर्ते सहभागी झाले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !