गायरान भागात मेंढपाळांना चराईसाठी परवानगी मिळावी : प्रशासनाला निवेदन


रावेर : तालुक्यातील मुंजलवाडी, चुनाबर्डी येथील मेढपाळ यांना सरकारी गायरानात चराई व पिण्याच्या पाण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी धनगर बांधवांतर्फे तहसील कार्यालयात निवेदनाद्वारे करण्यात आली.

पाणी व मेंढ्या चराईसाठी परवानगीची मागणी
निवेदनाचा आशय असा की, धनगर-मेंढपाळ बांधव 1947 पासून चुनाबर्डी (ता.रावेर) या ठिकाणी वास्तव्यास असून त्यांचा व्यवसाय हा मेंढीपालनाचा आहे. महाराष्ट्र शासन व महसुल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक एमएफपी -2103 / प्र.क्र .135 / फ -1 मंत्रालय, मुंबई 02 जानेवारी 2017 या शासन निर्णया नुसार राज्यात वनक्षेत्रात मेंढी चराईसाठी प्रायोगीक तत्वावर जळगाव व बुलढाणा जिल्ह्यांना परवानगी दिलेली होती. पाणी न मिळाल्यामुळे व चराई क्षेत्रात मेंढ्या चारु न दिल्याने आमच्या 10 ते 20 मेंढ्या दगावल्या होत्या. सरकारी वनक्षेत्रात मेंढ्या चराई तसेच पिण्याची पाण्यासाठी लालमाती धरण व पानथा धरण येथे मेंढ्यांना पाणी मिळण्याकामी परवानगी मिळण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.




निवेदन देताना यांची उपस्थिती
निवेदन देतांना माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, धनगर समाज जिल्हाध्यक्ष संदीप सावळे, रावेर पीपल्स बँक चेअरमन प्रवीण पाचपोहे, धनगर समाज शहराध्यक्ष शुभम नमायते आदी धनगर समाजबांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !