भुसावळात उद्या भारत विकास परीषदेतर्फे रक्तदान शिबिर
भुसावळ : भारत विकास परीषदेच्या वर्धापनदिनानिमित्त शनिवार, 10 रोजी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन रीदम हॉस्पिटलचे संचालक डॉ.नितीन पाटील यांच्याहस्ते होईल. परीषदेतर्फे लोक सेवेसाठी ऑक्सिजन कॉन्सस्ट्रेटर डॉ. मंगेश खानापूरकर यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. रक्तदान शिबिराचे आयोजन पांडुरंग टॉकीज येथे शनिवारी सकाळी 9.30 ते एक वाजेपर्यंत चालणार आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने परीषदेने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे .




