वरणगावात 157 तरुणांनी केला शिवसेनेत केला प्रवेश
आगामी निवडणुकीत नागरीकांना विचारूनच उमेदवार देणार : समाधान महाजन
वरणगाव : शहरातील सिद्धेश्वर नगरातील प्रभाग क्रमांक 18 मधील 157 तरुणांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन तसेच मुस्लिम समाजाचे नेते जाफरअली मकसूदअली (हिप्पी शेठ) यांच्यावर विश्वास ठेऊन नुकताच सिद्धेश्वर नगरात झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश केला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख समाधान महाजन होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा नियोजन समिती सदस्य अॅड.मनोहर खैरनार, अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख अफसर खान, शिक्षक सेनेचे इलियास खान, कार्यालय प्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, जिल्हा संघटक विलास मुळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, भुसावळ शहरप्रमुख निलेश महाजन, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, अॅड.कैलास लोखंडे, मुस्लिम समाजाचे नेते हिप्पी शेठ, कस्तुराबाई सुरवाडे, योगीता सोनार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.



यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सईद मुल्लाजी, बाळू माळी, यशवंत बढे, उमाकांत झांबरे, निलेश काळे, राजु माळी, ताज शहा, अब्रार खान, राहुल वंजारी, अरबाज पहेलवान, पवन माळी, आबा सोनार, अमर सोनार, दीपक पाटील, अस्लम शेख यांच्यासह अनेकांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन निलेश ठाकूर व संतोष सोनवणे यांनी केले.
उमेदवार लादणार नाही : समाधान महाजन
वरणगाव, भुसावळ येथील नगरपालिका निवडणुकीत प्रत्येक वॉर्डातील नागरीकांना विचारूनच उमेदवार आम्ही देणार आहोत. तुमच्यावर आम्ही जबरदस्ती कोणताही उमेदवार लादणार नाही. कारण तुमचा उमेदवार तुम्हालाच निवडून द्यायचा आहे. जबरदस्ती कोणताही उमेदवार आम्ही तुमच्यावर लादणार नसल्याचेही जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी यावेळी सांगितले.

