भुसावळातील डॉ.नितीन पाटील यांचा व्यापार्‍यांनी केला सन्मान


भुसावळ : कोरोनाकाळात रुग्ण सेवेसाठी चांगली सेवा तसेच रुग्णालयातर्फे राबविण्यात आलेल्या सामाजिक कार्याबद्दल रीदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट, ट्रामा आणि डायलीसीस सेंटर, भुसावळचे डॉ.नितीन पाटील यांना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सांगलीचे विजयसिंहराजे पटवर्धन यांनी मुंबई येथे सन्मानीत केले. या गौरवाची दखल घेत डॉ.नितीन पाटील यांचा व्यापारी महामंडळ भुसावळतर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी राधेश्याम लाहोटी, जयंतीलाल सुराणा, नरेंद्र लढ्ढा, श्याम दरगड, विजय काबरा, गौतम चोरडीया, नितीन सुराणा, कमलेश सांखला, द्वारकादास हेडा, महेंद्र कोठारी आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !