विहिरीत तोल जाऊन पडल्याने आदिवासी युवकाचा दुदैवी मृत्यु


कासारखेडा शिवारातील घटना : यावल पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद

यावल : तालुक्यातील कासारखेडा शिवारात असलेल्या शेतातील विहिरीत पडल्याने आदिवासी तरूणाचा मृत्यु झाला. याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रविवार, ११ जुलै रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास मोहम्मद हबीब तडवी (२२, कासारखेडा) हे व त्यांचा सोबत असलेले सहकारी जंगलातुन येत असतांना कासारखेडा शिवारातील सायबु तडवी यांच्या शेतातील विहिरीजवळ जावुन पाहत असतांना अचानक मोहम्मद तडवी यांचा तोल गेल्याने ते विहिरीत पडले. सोबत असलेल्यांनी याबाबतची माहिती त्यांच्या कुटुंबास दिली. रात्री अंधार असल्याने मृतदेह काढण्यास अडचणी आल्या दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला व डॉ.शुभम तिळके यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावल पोलीस स्टेशनमध्ये इतबार बशीर तडवी यांनी खबर दिल्याने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !