बहाळच्या शेतमजुराची आत्महत्या
चाळीसगाव : तालुक्यातील बहाळ येथील अस्संबर सदा मोरे (46, रा. बहाळ, ता.चाळीसगाव) यांनी गिरणा नदीच्या काठी असलेल्या बावरा नाले येथील बाभळाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली आहे. मोरे यांच्या पश्चात्य पत्नी व मुलगा असा परीवार आहे. या संदर्भात वाल्मिक दिगंबर मोरे (रा. बहाळ) यांच्या खबरीवरून मेहुणबारे पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शखाली तपास प्रताप मथूरे हे करीत आहेत.




