भुसावळातील तरुणाने गळफास घेत संपवले जीवन


भुसावळ- नवीन सातारा भागातील ओंकारेश्वर मंदिर परीसरातील रहिवासी व अनुराधा बॅग सेंटरचे संचालक असलेल्या 32 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवले. शनिवारी सकाळी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. क्षत्रिय तेलगु शिंपी समाजाचे सदस्य व अनुराधा बॅग हाऊसचा संचालक असलेल्या नितीन नंदकुमार कोटूरवार (32) असे मयत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी धाव घेतली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा व भाऊ असा परीवार आहे. नितीन हा वाल्मीक कोटूरवार यांचा लहान भाऊ होय.


कॉपी करू नका.