ईडी चौकशीचा मुक्ताईनगरातील पदाधिकार्‍यांनी नोंदवला निषेध


मुक्ताईनगर : खडसे कुटुंबियांची ईडीच्या माध्यमातून सातत्याने चौकशी केली जात असून या प्रकाराचा मुक्ताईनगरातील राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांनी निषेध केला. राष्ट्रवादीच्या कार्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून ईडी चौकशीचा निषेध नोंदवण्यात आला तसेच आगामी काळात हा प्रकार थांबला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी एकनाथराव खडसे यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पायखालची वाळू सरकल्यानेच ईडीचा गैरवापर
महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात एकनाथराव खडसे यांना मानणारा, त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे. त्यांची राजकीय व सामाजिक ताकद मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाची पायाखालची वाळू घसरू लागल्याने केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून भारतीय जनता पक्षाने खडसे यांच्या कुटुंबियांवर कुरघोडी करण्याचा केविलवाणा प्रकार सुरू केला असून हा प्रकार थांबवावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.




निवेदन देताना यांची उपस्थिती
निवेदन देताना बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, विधानसभा क्षेत्रप्रमुख विजय सोनार, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, पंचायत समिती सभापती सुवर्णा साळुंखे, प्रवक्ता सेल रावेर लोकसभा प्रमुख विशाल महाराज खोले, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवनराजे पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती विलास धायडे, दशरथ कांडेलकर, राजेंद्र माळी, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष शाहीद खान, राष्ट्रवादी महिला आघाडी तालुकाध्यक्ष रंजना कांडेलकर, राष्ट्रवादी महिला आघाडी शहराध्यक्ष निता पाटील, नंदा निकम, किशोर चौधरी, माफदा तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, राष्ट्रवादी मागासवर्गीय सेल तालुका अध्यक्ष नंदकिशोर हिरोळे, सरचिटणीस रवींद्र दांडगे, कल्याण पाटील, डॉ.बी.सी.महाजन यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !