सरपंच परीषदेच्या जिल्हा समन्वयकपदी प्रवीण गुंजाळ


भुसावळ : अखिल भारतीय सरपंच परीषदेच्या जळगाव जिल्हा समन्वयकपदी प्रवीण नथ्थथू गुंजाळ (चोरवड) यांची निवड करण्यात आली. अखिल भारतीय परीषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी एका पत्रान्वये ही निवड केली आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामीण भागासाठी दिलेले योगदान पाहता ईतर गावातील सरपंच व उपसरपंच व सदस्यांना योग्य ते मार्गदर्शन कराल, अशी खात्री असल्याने ही निवड करण्यात आल्याचे निवडपत्रात नमूद आहे. गुंजाळ यांच्या निवडीनंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !