भुसावळात चोरट्यांचा पशूधनावर डल्ला


भुसावळ : शहरातील तुळशी नगर भागातून झाडाला बांधलेली 15 हजार रुपये किंमतीची गाय अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना गुरुवार, 8 रोजी मध्यरात्री घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. निर्मल ब्रिजलाल पाल या तुळशी नगरात राहतात. घरासमोरील बदामाच्या झाडाला त्यांनी 15 हजार रुपये किंमतीची व लाल पट्टे असलेली गाय बांधली होती मात्र चोरट्यांनी 8 रोजी मध्यरात्री दोर सोडून ती चोरून नेली. तपास निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील जोशी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !