राजकीय षडयंत्रातून ईडीद्वारे चौकशी : राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीचे निवेदन


भुसावळ : माजी मंत्री एकनाथ खडसे यांची ईडी संस्थेकडून होणार चौकशी ही राजकीय षडयंत्रातून केली जात असून या प्रकाराचा निषेध नोंदवत राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शहराध्यक्षा नंदा निकम यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना विधिमंडळात धमक्या दिल्या जातात. भाजप नेत्यांच्या विरूध्द बोलले की, ईडीची धमकी दिली जाते शिवाय ईडीचा वापर करून भाजपतर्फे तोंड बंद केले जात असल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला. खडसे परीवाराला नाहक दिला जाणारा त्रास थांबवावा, अशी मागणी महिला पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केली. या प्रकरणी पक्षाच्या शहराध्यक्षा नंदा निकम यांच्या नेतृत्वाखाली प्रकश निकम, विलास लढे, सिता बाविस्कर, भारती भोसले आदींनी तहसीलदार दीपक धीवरे यांना निवेदन सादर केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !