ग्रामसेवकांचे खोटे अपंग प्रमाणपत्र प्रकरण दडपल्यास रास्ता रोको


दिव्याग बांधवांचा इशारा : रावेरात तहसीलदारांना निवेदन

रावेर : रावेर तालुक्यातील ग्रामसेवकांकडून सोयीच्या बदलीसाठी खोटे अपंग प्रमाणपत्र सादर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. आता कारवाई टाळण्यासाठी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असून यात सेटलमेंट झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल तसेच या प्रमाणपत्राची पडताळणी जिल्हा वैद्यकीय अधिकारी मारुती पोटे व त्यांचे सदस्य सलीम शेख यांच्यामार्फत करण्याची मागणी अपंग बांधवांनी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत पडताळणीची मागणी
निवेदनाचा आशय असा की, दिव्यांग बांधवांचे खोटे प्रमाणपत्र प्रकरण दडपण्याचा प्रयत्न ग्रामसेवकांकडून सुरू आहे. या प्रकरणाची पडताळणी जळगाव जिल्हा वैद्यकीय अधिकारी मारुती पोटे व त्यांचे सदस्य सलीम शेख यांच्यामार्फत करावी तसेच या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे सेटलमेंट झाल्यास तसेच ग्रामसेवकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास सर्व दिव्यांग बांधवांतर्फे रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. याबाबतचा इशारा भाजप तालुकाध्यक्ष दिव्यांग आघाडीचे रजनीकांत शामराव बारी, सचिव संदीप पाटील, दिव्यांग संघटना जिल्हाध्यक्ष संजय दिनकर बुवा, उपाध्यक्ष घनश्याम हरणकर, तालुकाध्यक्ष ईश्वर महाजन, उपाध्यक्ष महेश महाजन, संजय माळी, मूकबधीर अध्यक्ष निलेश पाटील, संदीप पाटील यांच्यासह मोठ्या संखेने दिव्यांग बांधव उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !