स्थानिक वाहनधारकांना 80 टक्के टोल माफ करा


शिशिर जावळे यांची केंद्रीय वाहतूक, रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

भुसावळ : धुळे, जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू असून महामार्गावर नशिराबाद ओलांडल्यावर सिमेंट फॅक्टरीजवळच टोल नाका उभारला जात आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा टोलनाका सुरू होण्याची दाट शक्यता असून या पार्श्‍वभूमीवर या टोल नाक्यावर स्थानिक रहिवाशांना टोलमध्ये 80 टक्क्यांपर्यंत सुट द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी केली आहे. राज्यात बर्‍याच टोल नाक्यांवर संबंधित टोल असलेल्या परीसर व जिल्ह्यातील स्थानिक लोकांना रहिवाशांना 75 ते 80 टक्के टोल माफी असून त्याच पद्धत्तीने अवलंब व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

मागणी मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा
सर्व प्रकारच्या थ्री व्हीलर्स, विविध सामाजिक संस्थांच्या उपक्रमात सहभागी असणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना, सर्व प्रकारच्या रुग्णवाहिका, सर्व प्रकारच्या अध्यात्मिक पदयात्रा व त्यात असलेल्या वाहनांना पूर्णपणे टोलमाफ करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीचे शिशिर जावळे यांनी केंद्रीय वाहतूक रस्ते व परीवहन मंत्री नितीन गडकरी, तथा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प प्रमुख चंद्रकांत सिन्हा यांच्याकडे केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे शिशिर जावळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !