खंडित वीजपुरवठा सुरळीत करावा : फैजपूर भाजपाचे निवेदन


फैजपूर : शहरात नवीन सब स्टेशनची निर्मिती झाल्यापासून वीजपुरवठा हा गेल्या 15 दिवसांपासून वारंवार वारंवार खंडित होत असल्याने शहरवासीय कमालीचे त्रस्त झाले आहे. शहरातील उद्योगधंद्यांना मोठी बाधा निर्माण होत असून सर्वसामान्य तसेच शेतकरी बंधूंना मोठा त्रास सोसावा लागत आहे. रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा बंद होत असल्याने मोठ्या प्रमाणात चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली फैजपूर भाजपाने महावितरणच्या ग्रामीण कार्यालयामध्ये विद्युत अधिकारी फिरके, कनिष्ठ अभियंता सरोदे यांच्याशी चर्चा करून निवेदन सादर केले.

तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
महावितरण जर विद्युत बिल भरण्यास विलंब झाला असत त्याचा दंड आकारते मात्र गेल्या 15 दिवसापासून विद्युत खंडित होत असल्याने उद्योगधंद्यांचे आर्थिक नुकसान होत आहे यामुळे व्यापार्‍यांसह शहरवासीयांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. यास महावितरणचा गलथानपणा कारणीभूत आहे. येत्या दोन दिवसात तक्रारीची निवारण न झाल्यास भाजपाकडून आंदोलन करण्यात येऊन ग्राहकांना विद्युत बिले न भरण्याचा इशारा देण्यात येणार आहे.




निवेदन देताना यांची उपस्थिती
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष निलेश राणे, तालुका उपाध्यक्ष नितीन नेमाडे, जयदीप राणे, भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहेते, संजय सराफ, पिंटू भाऊ तेली, नरेंद्र चौधरी, रीतेश चौधरी, हरीश होले, भरत कोल्हे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !