पाल आश्रमात गुरुपौर्णिमा महोत्सव रद्द
रावेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री वृंदावन धाम पाल आश्रमात यंदादेखील गुरुपौर्णिमा महोत्सव रद्द करण्यात आला आहे. दरवर्षी देशभरातून दरवर्षी अंदाजे पन्नास हजारांवर चैतन्य साधक परीवारातील सदस्य येथे दर्शनासाठी येतात मात्र गत वर्षांपासून कोरोना या महामारीच्या संसर्गामुळे यंदादेखील 23 जुलै रोजी गुरुपौर्णिमा महोत्सवाचा कार्यक्रम शासनाच्या आदेशाचे पालन करीत रद्द करण्यात आला आहे. अखिल भारतीय चैतन्य साधक परीवार, रावेर तालुका समितीसह आश्रमाचे विद्यमान गादीपती श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांनी गुरुपौर्णिमा गत वर्षाप्रमाणे साधकांनी आपापल्या घरीच राहून साजरी करावी तसेच पाल आश्रमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून परम पूज्य सद्गुरु बापूजी समाधी दर्शन लाईव्ह प्रसारण दाखविण्यात येणार आहे. कोणत्याही भाविकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पाल आश्रमात न येता फेसबुक, यूट्यूब च्या सहाय्याने घरीच ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




