स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेनेची ताकद दाखवा : विलास पारकर
रावेर : आगामी स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे जास्तीत-जास्त उमेदवार निवडणून आणावे व विश्वासातकी भाजपाला आपली ताकद दाखवण्याची ही योग्य वेळ असल्याचे प्रतिपादन रावेर लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर यांनी येथे केले. शहरात शिवसेनेचे रावेर विधानसभा क्षेत्राचे शिवसंपर्क अभियान राबविण्यासाठी बैठक झाली.
सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा
यावेळी पारकर म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या जास्तीत-जास्त योजना सर्व-साधारण जनतेपर्यंत पोहोचव्यात. यावेळी प्रहारमध्ये गेलेले शिवसैनिक प्रवीण चौधरी यांची सेनेत घरवापसी झाली. यावेळी बैठकीला लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर, विधानसभा संपर्क प्रमुख मोहन मसूरकर, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, यावल बाजार समिती सभापती मुन्ना पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, शिवसेना तालुका प्रमुख योगीराज पाटील, शिवसेना उपजिल्हा संघटक रवींद्र पवार, युवा सेना शहर प्रमुख राकेश घोरपडे, युवा सेना तालुकाप्रमुख प्रवीण पंडित, शिवसेना शहर प्रमुख नितीन महाजन, उपप्रमुख राम शिंदे, जयेश पाटील, गणेश महाजन, भैय्या पाटील, उमेश वरणकर, आकाश चौधरी, संतोष महाजन, योगेश धनके, महिला शहर संघटक बबली महाजन, दक्षता समिती सदस्य कल्पना महाजन, कुणाल बागरे आदी शिवसैनिक उपस्थित होते. सूत्रसंचलन अशोक शिंदे यांनी केले.




