वरणगाव ग्रामीण रुग्णालयाचा बंद वीजपुरवठा भाजपाच्या दणक्याने सुरू


वरणगाव : ग्रामीण रुग्णालयाचा वीजपुरवठा वीज बिल न भरल्यामुळे खंडित करण्यात आला होता परीणामी नागरीकांचे सुरू असलेले लसीकरण प्रशासनाने बंद केले होते. माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी माजी मंत्री संजय सावकारे यांना याबाबत तक्रार करताच आमदारांनी कार्यकारी अभियंता महेश पाटील यांना वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना करताच वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

पदाधिकार्‍यांचा ताफा धडकला
सामाजिक कार्यकर्ते राजेश काकांनी यांनी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांना भ्रमणध्वनीवरून खंडित वीजपुरवठ्याची माहिती दिली. त्यांनी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह शहराध्यक्ष सुनील माळी, कामगार नेते मिलिंद मेढे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, सरचिटणीस गोलू राणे, भाजयुमोचे संदीप भोई, पप्पू ठाकरे, आकाश निमकर, दीपक चौधरी, भाजपाचे बळीराम कोळी, साबीर कुरेशी, राहुल जंजाळे, नथ्थू कोळी, हितेश चौधरी, डी.के.खाटीक, डॉ.सादिक हाजी अल्लाउद्दीन सेठ, कृष्णा माळी,, संदीप माळी, नटराज चौधरी, ज्ञानेश्वर घाटोळे, गजानन वंजारी, योगेश माळी, योगेश चौधरी, डॉ.प्रवीण चांदणे यांचा ताफा ग्रामीण रुग्णालयात पोहचला. डॉ क्षितीजा हिंडवे, उपकार्यकरी अभियंता तुषार गांजरे, पाटील यांना ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत असल्याने हा प्रकार थांबवण्याची अपेक्षा व्यक्त करीत तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याचा आग्रह धरण्यात आला.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !