श्री भगवान परशूराम मंदिरात भाविकांसाठी आर.ओ.मशीनची सुविधा
भुसावळ : तापी नदी किनारी असलेल्या श्री भगवान परशुराम मंदिरात परशुराम जयंती उत्सव समिती व समस्त ब्राह्मण समाजाच्या भाविकांसाठी थंंड पाण्याची मशीन (आर.ओ.) लावण्यात आली. तापी जन्मोत्सव दिनाचे औचित्य साधून तापी आईची विधीवत पूजाप करण्यात आली. शिवसेनेचे रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विलास पारकर, चोपड्याचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्याहस्ते आर.ओ.मशीनचे उद्घाटन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
संपर्कप्रमुख मसूरकर, कार्यालयीन जिल्हा प्रमुख प्रा.उत्तमराव सुरवाडे, शिवसेना शहरप्रमुख निलेश महानज. विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, कट्टर शिवसैनिक व शिवभोजन केंद्र संचालक उमाकांत (नमा) शर्मा, देवेश कुलकर्णी, पवन मेहरा, परशुराम मंदिराचे ट्रस्टी अरुण पाटील, डॉ.खाचणे, सुरेश पाटील, सुभाष पाटील, मंदिराचे पुजारी देवेंद्र जोशी, पुरोहित दीपक पाथरकर, गोपाल जोशी, रमाकांत केव्हाळकर, प्रभाकर जोशी, हेमंत जोशी, कौस्तुभ देवधर व समाजबांधव उपस्थित होते.



