विवाहितेची आत्महत्या : पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा


चाळीसगाव : तालुक्यातील तमगव्हाण येथील विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी पतीसह पाच जणांवर चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वैशाली उर्फ उज्ज्वला राजेंद्र पाटील (43, रा. तमगव्हाण, ता.चाळीसगाव) या विवाहितेचा लग्नाच्या वर्षभरातच मुलगा होत नाही म्हणून मानसिक छळ करण्यात आला व यास कंटाळून विवाहितेने शुक्रवार, 16 जुलै रोजी दुपारी आत्महत्या केली. सासरच्या छळाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप मयत मुलीचे वडील योगराज नामदेव देसले (रा.पिंपळगाव, ता.भडगाव ह.मु.वळुज औरंगाबाद) यांनी केल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पती राजेंद्र प्रताप गायकवाड, सासरे प्रताप गोपाळ गायकवाड, ंसगीता नाना काळे, दिनकर प्रताप गायकवाड आणि केशव गोपाळ गायकवाड (सर्व रा.तमगव्हाण, ता. चाळीसगाव) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहे.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !