भुसावळातील बनावट देशी दारूचा कारखाना प्रकरणी रवींद्र ढगे ताब्यात


पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : अनेक जण रडारवर

भुसावळ : शहरातील शिवपूर कन्हाळे रस्त्यावरील फर्निचर गोदामात सुरू असलेला बनावट देशी दारूचा कारखाना पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शनिवारी सायंकाळी उद्ध्वस्त केला होता. पथकाने या प्रकरणी रविवारी दुपारी फर्निचर गोदामाचे मालक रवींद्र ढगे यांना चौकशीकामी ताब्यात घेतले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्थानिक निरीक्षक ईश्‍वर वाघ यांनी दिली.

बनावट दारूचे भुसावळ व्हाया कोपरगाव कनेक्शन
पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अलीकडचे कोपरगावच्या एका दारू विक्रेत्याकडे धाड टाकली असता त्यात बनावट दारू आढळली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधितास अटक करण्यात आल्यानंतर त्याने चौकशीत ही दारू भुसावळातून आणल्याची कबुली दिल्यानंतर पुण्याचे पथक भुसावळात वॉच ठेवून होते. पथकाला शिवपूर कन्हाळे रस्त्यावरील गोदामाताच बनावट दारूची निर्मिती होत असल्याची खातरजमा झाल्यानंतर त्यांनी स्थानिक पथकाला अनभिज्ञ ठेवत अचानक धाड टाकून सुमारे 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करीत कारखाना उद्ध्वस्त केला.




पुण्यात गुन्हा दाखल
भुसावळात झालेल्या कारवाईनंतर पुणे उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने 350 टँगो पंच दारूचे खोके, तीन ड्रम स्पीरीट, दारू सील करण्यासाठी लागणारे मशीन, रीकामे बुच, बाटल्या आदी मिळून सुमारे 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून तो एका वाहनातून भुसावळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आणला आहे. या प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

फर्निचर गोदाम मालकाला घेतले ताब्यात
शिवपूर कन्हाळे रस्त्यावरील व्हीआयपी कॉलनीजवळ रवींद्र ढगे यांच्या मालकिचा गणेश पावडर व कोटींग फर्निचर प्लाँट वजा गोदामात बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतर रविवारी पुण्याच्या पथकाने जागा मालक रवींद्र ढगे यांना चौकशीकामी ताब्यात घेतले आहे. बनावट दारूचा कारखान्याचा नेमका मालक कोण? हा कारखाना नेमकाकिती दिवसांपासून सुरू होता शिवाय आतापर्यंत कारखान्यातील दारूचा पुरवठा नेमका कुठे-कुठे करण्यात आला? या बाबींचा उलगडा लवकरच व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !