भुसावळातील खून प्रकरणी दुसरा संशयीत आरोपी ताब्यात


भुसावळ : वाढदिवसाच्या पार्टीत वाद उफाळल्यानंतर सचिन ज्ञानदेव भगत (30, श्रद्धा नगर, भुसावळ) या तरुणाचा डोक्यात लोखंडी फावडा व चेहर्‍यावर धारदार शस्त्र मारून खून करण्यात आला होता. शुक्रवार, 16 रोजी मध्यरात्री जामनेर रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ ही घटना घडली होती. खून प्रकरणी सुरुवातीला मुन्ना चौधरी या हद्दपार आरोपीला अटक करण्यात आली होती तर रविवारी दुसरा संशयीत राहुल कल्ले यास पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. गुरुवारी सचिन भगत या तरुणाचा वाढदिवस असल्याने त्याने जामनेर रोडवर मित्रांसोबत पार्टी केली व त्यात वाद झाल्याने मित्रांनी त्याचा खून केला होता. या प्रकरणी मुन्ना चौधरी, राहुल कल्ले, जितू पावरा व अन्य इसमाविरोधात बाजारपेठ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !