खिर्डी खु.॥ मध्ये तलवार बाळगली : एकास अटक
खिर्डी : खिर्डी खुर्द गावातील हेमंत इच्छाराम भंगाळे (24) या तरुणाने अवैधरीत्या लोखंडी तलवार कब्जात बाळगली असल्याची माहिती निंभोरा पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करीत तलवार जप्त केली. या प्रकरणी तरुणास अटक करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल जाकिर पिंजारी यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहा.निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अन्वर तडवी, सादिक शेख, स्वप्नील पाटील, संदीप पाटील यांनी केली. तपास अन्वर तडवी करीत आहेत.




