भुसावळ तालुक्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार : संशयीतास अटक
भुसावळ : तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना सन 2018 ते 12 जुलै 2021 या काळात घडली. या प्रकरणी शहर पोलिसात पाच संशयीत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी एका सज्ञान आरोपीस अटक करण्यात आली तर अन्य चार अल्पवयीन आरोपी असल्याने त्यांना बुधवारी बाल न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे.
अटकेतील आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी
17 वर्षीय पीडीता आपल्या दोन मित्रांसोबत एका शाळेत शिक्षण घेते तर या मित्रांच्या अन्य तीन मित्रांनी मिळून रेल्वे नॉर्थ कॉलनीतील बंद रेल्वे कॉर्टरमध्ये मुलीवर अत्याचार केला व त्याचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला व याची चर्चा सुरू झाल्याने अल्पवयीन पीडीतेने कुटुंबियांना माहिती दिली. पीडीतेसह पालकांनी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना घडला प्रकार सांगितल्यानंतर पाच संशयीतांविरोधात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सुबोध सुरेश यशोदे (20) या युवकाला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अन्य संशयीत अल्पवयीन असल्याने त्यांना बाल न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे.



