वराडसीमच्या महिलेचा वीज खांब्याचा शॉक लागल्याने मृत्यू
गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात जोगलखोरी शिवारातील घडली दुर्दैवी घटना
भुसावळ : शेतातील वीज खांबास चिपकलेल्या गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात महिलेचाही शॉक लागल्याने मृत्यू झाला. बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास तालुक्यातील वराडसीम ग्रुप ग्रामपंचायतीत येणार्या जोगलखोरी शिवारात ही घटना घडली. कमलबाई सुरेश पाटील (57, रा.वराडसीम, ता.भुसावळ) असे मयत महिलेचे नाव आहे.
गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात महिलेचा मृत्यू
समजलेल्या माहितीनुसार, जोगलखोरी शिवारातील नरेंद्र विठ्ठलदास लढ्ढा यांच्या मालकीच्या शेतात लोखंडी वीज खांब्यात वीज प्रवाह उतरल्याने त्याचवेळी तेथे चारा खात असलेल्या गायीचा वीज स्पर्श झाल्याने गायी चिपकल्याने ती विव्हळत असताच कमलबाई सुरेश पाटील यांनी गायीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यादेखील वीज खांब्याला चिपकल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. वीज कंपनीला यापूर्वीदेखील खांब्यात वीज प्रवाह उतरल्याची सूचना करण्यात आली मात्र दखल न घेतल्याने दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप घटनास्थळी करण्यात आला. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला माहिती कळवल्यानंतर युनूस शेख व राजेश पवार यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला.



