भुसावळ शहरात शिवसेनेतर्फे समस्या निवारण मोहिम


पदाधिकार्‍यांनी जाणल्या समस्या : पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण ; शिवसेना सदस्य पदासाठी केली नोंदणी

भुसावळ : शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने 12 जुलै ते 24 जुलै या काळात राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत भुसावळ दक्षिण भागातील खडका रोड, जाम मोहल्ला, पापा नगर, मिल्लत नगर, गुंजाळ कॉलनी, तळेले कॉलनी, पाटील मळा, विभागात सोमवारी, 19 जुलै रोजी समस्या निवारण मोहीम राबविण्यात आली. वृक्षारोपण आणि शिवसेना सदस्य नोंदणी करण्यात आली.

नागरीकांशी साधला संवाद
भुसावळ शहरातील दक्षिण भागात शिवसैनिकांनी घरोघरी जाऊन, नागरिकांशी संवाद साधला. वीज, पाणी, घंटागाडी, आरोग्य, वीज वितरण कंपनीशी संबंधित तक्रारी, परिसर स्वच्छता, रस्ते, ड्रेनेज, पथदीप, रेशनिंगचे धान्य आदींबाबतच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. संबंधित खात्याशी संपर्क साधून या सर्व समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे यांनी सांगितले.




यांची होती उपस्थिती
जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे, माजी नगरसेवक दीपक धांडे, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, शिक्षकसेना जिल्हाप्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड, उर्दू विभागाचे इलियास शेख, उपशहर प्रमुख अन्सार शाह, पवन नाले, नबी पटेल, आसिफ मोटू, अकिल तडवी, इद्रिस बागवान, सिकंदर गवळी, साबीर हजाम, मनोज पवार, शेख मेहमूद, कैलास लोखंडे, पवन मेहरा, हेमंत बर्‍हाटे, सुरज पाटील, दिव्यांग सेनेचे विनोद गायकवाड, शरद जैसवाल, गजानन निळे आणि पदाधिकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !