जखमी पायलटसाठी अंगावरील साडी फाडून देणार्‍या आदिवासी मातेचा सत्कार


जळगाव : चोपडा तालुक्यातील वर्डी या आदिवासी भागात प्रशिक्षणार्थी विमान कोसळल्याची घटना 16 जुलै रोजी घडली होती. या अपघातात पायलट नुरुल अमीन यांचा मृत्यू ओढवला होता तर प्रशिक्षणार्थी पायलट अंशिका गुजर या जखमी झाल्या होत्या. जखमी झालेल्या गुजर यांच्यासाठी बांबूचे स्ट्रेचर तयार करण्यात आले मात्र त्यासाठी लागणारे कापड नसल्याची अडचण ओळखून आदिवासी माता विमलबाई भील (61) यांनी आपल्या अंगावरील साडी फाडून ती झोळी तयार करण्यासाठी उपलब्ध करून देत मानवतेचे दर्शन घडवले होते. या कार्याची दखल घेत जळगाव पोलीस दलातर्फे आदिवासी माता विमलाबाई भील यांचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून साडी-चोळी व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या सुचनेनुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !