यावलला गुरूपौर्णिमा साध्या पद्धत्तीने साजरी होणार


कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम रद्द : भाविकांना दर्शनार्थ न येण्याचे आवाहन

यावल : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील श्री महर्षी व्यास मंदिरात
गुरूपौर्णिमेनिमित्त शुक्रवार, 23 रोजी होणारे सर्वच धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. यंदा मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव साध्या पध्दतीने साजरा केला जाणार आहे आहे. सकाळी महापूजा 8 ते 10 या वेळेत पाच जोडप्यांच्या हस्ते होईल. महापूजेचे व श्री व्यासांचे दर्शन थेट प्रक्षेपणाव्दारे फेसबुकच्या माध्यमातून होईल. भाविकांनी येथे दर्शनासाठी येवू नये, असे आवाहन श्री महर्षी व्यास मंदिर व श्रीराम मंदिर संस्थान समिती, यावलतर्फे करण्यात आले आहे.

दोन वर्षांपासून उत्सव रद्द
शुक्रवार, 23 रोजी गुरूपौर्णिमेनिमित्त येथे दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा उत्सव दोन वर्षांपासून कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर रद्द केला जात आहे व यंदा देखील येथे मंदिरात मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत सकाळी 8 ते 10 या वेळेत श्री महर्षी व्यासांची महापुजा पाच जोडप्यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाचे श्री महर्षी व्यास या फेसबूक पेजवर थेट प्रेक्षपण केले जाणार आहे. भक्त, भाविकांनी घरूनचं दर्शन घ्यावे व मंदिरात कोणीही दर्शना करीता येवु नये त्याच प्रमाणे दरवर्षी मंदिरात आयोजित केला जाणारा महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे याची नोंद भाविकांनी घ्यावी, असे आवाहन श्री महर्षी व्यास मंदिर व श्रीराम मंदिर संस्थानतर्फे करण्यात आले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !