गावठी कट्टा व जिवंत काडतूसांसह दोघे संशयीत गुन्हे शाखेच्या जाळ्यात


पाचोरा : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिवंत काडतुस व गावठी कट्टा बाळगणार्‍या दोन तरूणांना अटक केली असून त्यांच्याविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अशोक बाबुलाल पवार (28, रा.सारोळा बु.॥, ता.पाचोरा) व सुरज नारायण शिंदे (30, रा.कृष्णापुरी, पाचोरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत सारोळा बु.॥, ता. पाचोरा रोडवरील शांताराम सोनजी पाटील यांच्या जुन्या खडीमशिन जवळील महादेव मंदिर परीसरात ही कारवाई करण्यात आली.

यांनी केली कारवाई
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल विलास पाटील, हरीष परदेशी व उमेश गोसावी यांनी सापळा रचून ही कारवाई केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत घोडसे हे करीत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !