भुसावळात गुरुपौर्णिमेनिमित्त स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन


भुसावळ : शिवसैनिकांचे गुरु म्हणजे सर्वाचे हिंदू ह्रदय सम्राट, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे. गुरुपूर्णिमेच्या निमित्ताने शहरातील कट्टर शिवसैथनक नमा शर्मा यांच्या शिवभोजन केंद्रावर शुक्रवारी सकाळी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे ज्येष्ठ मार्गदर्शक विलासजी मुळे, शिवसेना कार्यालयीन उपजिल्हा प्रमुख प्रा.उत्तमराव सुरवाडे, नगरसेवक मुकेश गुंजाळ, शिवसेना शहरप्रमुख निलेश महाजन, पंचायत समिती स दस्य विजय सुरवाडे, ज्येष्ठ शिवसैनिक शरद जोहरे यांच्याहस्ते करण्यात आले. कट्टर शिवसैनिक व शिवभोजन केंद्राचे संचालक आयोजक उमाकांत (नमा)शर्मा व शिवसैनिक प्रसंगी उपस्थित होते. यावेळी गरजूंना शिवभोजनासोबत बुंंदीच्या लाडूंचे वाटप करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !