अल्पवयीन मुलीवर अत्याचार : आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी
भुसावळ : तालुक्यातील कंडारी येथील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना सोमवारी उघडकीस आली होती. या प्रकरणी सुबोध यशोदे या संशयीतास अटक करण्यात आली होती. आरोपीची शुक्रवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्यातील पीडितेची रवानगी बालसुधारगृहात झाली तर गुन्ह्यातील चौघे अल्पवयीन असल्याने त्यांना बालन्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांकडून चारही संशयितांच्या जन्माचे दाखले, शाळेतील लिव्हिंग सर्टिफिकेट मिळवण्याचे काम सुरू आहे. तसेच घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहेत.




