भुसावळात 45 वर्षीय अनोळखीचा मृतदेह आढळला
भुसावळ : शहरातील रेल्वे कंटेनर, गुडस शेडजवळील नाल्याच्या काठी 40 ते 45 वर्षीय अनोळखी इसमाचा कुजलेल्या मृतदेह शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास आढळल्याने खळबळ उडाली. मयताच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. अज्ञात बेवारस मृतदेहाचा शनिवारी वास येत असल्यानंतर याबाबतची माहिती नागरीकांनी बाजारपेठ पोलिसांना दिल्यानंतर पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत व सहकार्यांनी भेट देवून पाहणी केली. मयत भिकारी असल्याचा पोलीस प्रशासनाला संशय आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात रेल्वे गुडस डेपोचे पर्यवेक्षक मुनेश्वर लिंगय्या जंगम (नसरवांजी, भुसावळ) यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहा.निरीक्षक हरीष भोये करीत आहेत.




