भुसावळात ऑलम्पिक जागरण अभियान
भुसावळ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव तसेच भुसावळ तालुका क्रीडा संकुल समिती, भुसावळ व महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरीक शिक्षक महासंघ जळगांव जिल्हा, तालुका क्रीडा स्पर्धा समिती, भुसावळ. यांच्या विद्यमानाने राबवण्यात आलेल्या ऑलम्पिक जागरण उपक्रमाचा शुभारंभ झाला. टोकियो येथे होणार्या ऑलिंपिक स्पर्धेत महाराष्ट्राचे दहा खेळाडू सहभागी आहेत. या सर्व सहभागी खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी व भुसावळ तालुक्यात खेळाचे वातावरण निर्माण व्हावे खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे तसेच ऑलिम्पिक खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी गांधी पुतळ्याजवळ करोनेशन क्लब भुसावळच्या प्रांगणात सेल्फी पॉइंटचे उद्घाटन फीत सोडून, व बलून हवेत तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी तालुका संकुल समितीचे कार्याध्यक्ष तहसीलदार दीपक धीवरे, संकुल समितीचे सचिव तालुका क्रीडा अधिकारी, मार्क धर्माई, तालुका क्रीडा समन्वयक बी.एन.पाटील, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरीक शिक्षण शिक्षक महाराष्ट्र संघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ.प्रदीप साखरे, इबटा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.आर.धनगर, भुसावळ हायस्कूलचे पर्यवेक्षक क्रीडा शिक्षक प्रमोद शुक्ला, राजेंद्र कुलकर्णी, एम.के.वाणी व खेळाडू उपस्थित होते. प्रसंगी आमदार संजय सावकारे यांनी टोकियो ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व सर्व खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावून देशाला जास्तीत-जास्त पदक मिळण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.



यांनी घेतले परीश्रम
कार्यक्रमास हिंदू सभा न्यास, भुसावळ, कोरोनेशन क्लब व सतेज क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व खेळाडू, द.शि.विद्यालय भुसावळचे शिक्षक आर.डी.पाटील. संदीप जाधव, एम.पी.नेहते, शरीफ तडवी, सचिन राजपूत, दर्शन चिंचोले, सागर जल्लाद, खरे, श्याम माहूरक, नरेंद्र म्हस्के यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन राजेंद्र कुलकर्णी तर आभार बी.एन.पाटील यांनी मानले.

