भुसावळातील प्रभाग 10 मधील पथदिवे सुरू करा


भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक दहामधील पथदिवे बंद असल्याने नागरीकांची मोठी गैरसोय होत आहे. ओंकारेश्‍वर मंदिर परीसरासह इमाम वाडा, गरूड प्लॉट, काशीनाथ लॉजमागील परीसर, लोखंडी पुलाजवळील परीसर, कॉसमॉस बँक परीसर, दामू कुंभारवाडा आदी भागात पथदिवे बंद असल्याने नागरीकांना मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे. आधीच पावसाळ्याचे दिवस असून त्यातच रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्याने आबालवृद्धांना मोठा त्रास सोसावा लागत आहे. पालिका प्रशासनाने तातडीने दखल घेवून गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा अ‍ॅड.तुषार पाटील यांनी व्यक्त केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !