भालोदला रोटावेटर मशीन लांबवले


फैजपूर : येथून जवळ असलेल्या भालोद गावातील यू इंग्लिश स्कुल शाळेच्या आवारात लावलेले 40 हजार रुपये किंमतीचे रोटावेटर मशीन अज्ञात चोरट्यांनी लांबवले. 23 जुलै रोजी रात्री 10 ते 24 जुलै रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी जगदीश भास्कर कुंभार (34, रा.कृष्ण नगर, भालोद) यांनी फैजपूर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक किरण चाटे करीत आहेत.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !