भुसावळात मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
भुसावळ : शिवसेनेचे माजी खासदार तथा रेल कामगार सेनेचे केंद्रीय अध्यक्ष आनंदराव अडसुळ यांच्या आदेशाने रेल कामगार सेना, भुसावळ मंडळतर्फे शहरातील रेल्वे रुग्णालयात सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कोरोना महामारी व राज्यावर आलेले पूर संकट पाहता मुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साजरा न करता सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन केल्याने त्याची दखल घेवून राज्यातील रक्ताचा तुटवडा पाहता शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यांची शिबिराला उपस्थिती
मुख्य चिकित्सा निर्देशक डॉ.श्रवणकुमार, सहाय्यक चिकीत्सा निर्देशक डॉ.कश्यप, जे.एम.जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोनासारख्या महामारीत रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याने डॉ.श्रवणकुमार यांनी रेल कामगार सेनेचे विशेष कौतुक केले. यावेळी रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा, प्रीतम टाक, योगेश माळी, विनोद वाघे, मंगू खंडू शेलोडे, प्रकाश करसाळे, मुकुंद मोरे, ईश्वर पाटील, राजेश तायडे, शुभम चौव्हान, मोहन राजपूत, शांताराम सपकाळे, महेंद्र सोनवणे, संजय चौधरी, भरत शर्मा, एम.के.शाह, समीरसिंग, सुनील उबाळे, प्रमोद हिवरे, किरण मलबारी, मुकेश महाजन, विजय पाटील, राजेश नकवाल, आर.एस.पाठक, एस.एन.बोकाडे, अरविंद थोरात, संदीप जावले, कमलाकर बाणाईत, पंकज ठाकरे, रमेश मराठे, सुरेंद्र यादव, राजू सुरवाडे, महेश गुजर, गोविंदा कुमार आदी उपस्थित होते. शिवसेनेने जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, प्रा.धीरज पाटील, विलास मुळे, बबलू बर्हाटे, संतोष सोनवणे, दीपक धांडे, आर.एस.सोनार आदींनी शिबिराला सदिच्छा भेट दिली. भुसावळ विभागातील 45 रेल्वे कर्मचार्यांसह नागरीकांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना हेल्मेट, पेन व एन 95 मास्क देण्यात आले. शिबिर यशस्वीतेसाठी सर्व रेल कामगार सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.



