निंभोरा-तांदलवाडी गटातील कामांची चौकशीची मागणी


विविध संघटनांनी रावेर पंचायत समितीवर काढला मोर्चा

रावेर : रावेरात गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांच्या समर्थनार्थ तर जिल्हा परीषद सदस्य नंदकिशोर महाजन यांच्या विरोधात विविध संघटनांतर्फे घोषणाबाजी करून मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या. निंभोरा-तांदलवाडी गटातील कामांची चौकशी करण्याचे निवेदन गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांना यांना देण्यात आले.

चौकशीच्या मागणीचे पडसाद
रावेर तालुक्यातील दलितवस्ती योजनेच्या कामांच्या ई-निविदा प्रक्रियेत नियमांची पायमल्ली झाली असून याची चौकशी करण्याची मागणी जि.प.च्या सर्वसाधारण बैठकीत जिल्हा परीषद सदस्य नंदकिशोर महाजन यांनी केली होती. याचे पडसाद सोमवारी रावेरात पहायला मिळाले. या प्रकरणाला आता पूर्ण राजकीय वळण लागले असून सोमवारी विविध संघटना आक्रमक झाल्या व त्यांनी मोर्चा काढला. यावेळी निंभोरा-तांदलवाडी गटातील सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हा परीषद सदस्य नंदकिशोर महाजन यांच्याविरोधात तर गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांच्या समर्थनार्थ पंचायत समितीत घोषणाबाजी करण्यात आली.




यांचा होता मोर्चात सहभाग
बीएसपी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप सपकाळे, राजू खिरवडकर, ठेकेदार बाजीराव ठाकरे, संतोष ढिवरे, ईश्वर जाधव, लोक संघर्षचे नुरा तडवी, इरफान तडवी, गणेश बारेला, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष कुणाल महाले, सामाजिक विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष पंकज वाघ, चाँदखा तडवी, शरीफ तडवी, जमील तडवी, काँग्रेस अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष सावन मेढे, आदिवासी एकता परीषदेचे प्रकाश भिल आदी पदाधिकारी सहभागी झाले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !