भुसावळात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेनेतर्फे मदतफेरी
भुसावळ : राज्यातील अनेक भागात पावसामुळे मोठे संकट कोसळले असून अनेक नागरीकांना बेघर होण्याची वेळ आली आहे. आपदग्रस्तांना मदत मिळण्यासाठी भुसावळात शिवसेना पदाधिकार्यांनी मंगळवारी मदतफेरीचे आयोजन केले. जमलेला निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात येणार आहे. पदाधिकार्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून मदतफेरीची सुरूवात केली. मॉडर्न रोड, सराफ बाजार, वसंत टॉकीज रोड, गांधी पुतळ्यादरम्यान मदतीचे आवाहन करण्यात आले. दुकानदार, व्यापारी, हात गाडी वाले यांच्याकडून मदत निधी जमा करण्यात आला. जमलेला निधी तहसीलदारांकडे जमा करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अॅड.जगदीश कापडे, शहरप्रमुख निलेश महाजन, शेख, ईल्यास सर, नगरसेवक मुकेश गुंजाळ, उपशहरप्रमुख राकेश खरारे, शिवसैनिक व शिवभोजन केंद्र संचालक उमाकांत शर्मा (नमा), विभागप्रमुख अरुण साळुंखे, शिवसैनिक जाकीर पेंटर, धीरज वाढोणकर, शिवाजी दाभाडे, अशोकराव हिंगणे, समीर तडवी आदी शिवसैनिक उपस्थित होते.



