भुसावळात मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे महापूजा
भुसावळ : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभण्यासाठी तसेच महाराष्ट्रासह देशावरील कोरोनाचे व महापुराचे संकट दूर व्हावे, सर्व नागरीरकांना सुख, समृद्ध आणि निरोगी आयुष लाभावे या उद्देशाने भुसावळ शिवसेना शहरप्रमुख बबलू बर्हाटे यांनी महापूजेचे आयोजन गायत्री मंदिरात केले होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हाप्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, माजी तालुका प्रमुख नीळकंठ फालक, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, माजी नगरसेवक दीपक धांडे, रेल कामगार सेना मंडळ अध्यक्ष ललित मुथा, शहरप्रमुख बबलू बर्हाटे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका पूनम बर्हाटे, तालुका संघटिका भूराबाई चव्हाण, माजी नगराध्यक्षा माधुरी फालक, उपशहरप्रमुख पवन नाले, नामदेव बर्हाटे, रोहिदास चव्हाण, विक्की चव्हाण, युगेंद्र काकडे, चेतन भोई उपस्थित होते.



