भाजपा जळगाव जिल्हा झोपडपट्टी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी वरणगावचे युसूफ खान नूर खान


वरणगाव : भारतीय जनता पार्टी झोपडपट्टी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी वरणगावचे युसुफ खान नूर खान यांची नियुक्ती भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे यांनी केली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, शहराध्यक्ष सुनील माळी, उपाध्यक्ष हितेश चौधरी यावेळी उपस्थित होते. युसूफ खान नूरखान हे वरणगाव शहरातील भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते असून पक्षाच्या आंदोलनात व पक्ष वाढीच्या कार्यक्रमात वेळोवेळी सक्रिय सहभाग घेतला आहे. युसूफ खान यांच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे माजी मंत्री गिरीश महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे आदींनी अभिनंदन केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !